पनवेल दि.०४(संजय कदम): हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन व शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा भागातील शेकडो युवकांनी युवासेना पक्ष प्रवेश केला.
या युवकांमध्ये अनेक वकील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी युवासेना शहर प्रमुख पदी क्षितिज शिंगरे यांची नियुक्ती करण्यात आली.
पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, रायगड जिल्हा प्रमुख, युवासेना जयेंद्र देशमुख, रायगड जिल्हा सचिव, युवासेना संदीप भोईर यांच्या उपस्थितीत सचिव पनवेल विधानसभा युवासेना रोशन पुजारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम कळंबोली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.
Tags
पनवेल