पनवेल दि.०४(संजय कदम): पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. या विजयानंतर भाजपच्या विजयाबद्दल प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी ठाणानाका येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.
या वेळी फटाक्यांची आतजबाजी करून, वाद्यांच्या गजरात नाचून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवून काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला धोबीपछाड दिला आहे.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून एकमेकांचे अभिनंदन केले. या वेळी भाजपचे विजयानंतर पनवेल येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विक्रांत पाटील म्हणाले कि,आगामी येणाऱ्या सर्व निवडणूकसुद्धा भाजप व मित्र पक्ष एकत्रितपणे लढवून विजयी होतील यात तिळमात्रही शंका नाही असे प्रतिपादन केले.
Tags
पनवेल