पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल जवळील नवकार यार्ड कंपनी कसळखंड याच्या मुख्य गेट समोर कंटेनरची धडक एका स्कुटी गाडीस पाठीमागून बसून यात स्कुटीवरील चालक खाली पडल्याने तो कंटेनरच्या मागील टायरखाली येवून त्यात गंभीररित्या जखमी होवून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
कंटेनर क्र.एमएच-48-सीबी-6060 वरील चालक हा त्याच्या ताब्यातील गाडी घेवून बेदकारपणे, हलगर्जीपणे चालवून त्याने पुढे जाणार्या स्कुटीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक दिनेशसिंग अत्तरसिंग चौैहान (39 रा.कामोठे) हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Tags
पनवेल