पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः एका 15 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने त्यास कशाची तरी भुरळ घालून त्याच्या कुुटुंबियांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु.अभय दयाशंकर जैसवाल (15) रा. सेक्टर 2, करंजाडे, रंग सावळा, बांधा मध्यम, उंची 5 फुट, केस लहान असून अंगात गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट व हिरव्या रंगाची ट्रॅक पॅन्ट सोबत स्कूल बॅग आहे.
त्याला हिंदी, इंग्रजी, मराठी व भोजपूरी भाषा अवगत आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक हषर्र्द जुईकर मो.नं.9833222081 यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल