मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर संजय जैन यांची निवड
मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर संजय जैन यांची निवड 
पनवेल दि. २७ (संजय कदम ) : मध्य रेल्वेचे अत्यंत महत्वाचे व मध्यवर्ती स्थानक असलेल्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर सामाजिक कार्यकर्ते संजय जैन यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे .                           या निवडीचे पत्र संजय जैन यांना नुकतेच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथील मंडळ कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक जितेंद्र यादव यांच्या कडून देण्यात आले आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर संजय जैन यांची ही निवड १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या एक वर्षाच्या कालावधी साठी असणार आहे . या स्थानकातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे , व त्यावर उपाययोजना करणे ,सार्वजनिक हिताचा व सार्वजनिक सोयीचा कोणताही विषय ,प्रवाशांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे अश्या विविध बाबतीत ही रेल्वेची कमिटी कार्य करीत असते . अश्या या महत्वपूर्ण कमिटीवर सामाजिक कार्यकर्ते संजय जैन यांची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे . 


थोडे नवीन जरा जुने