पनवेल दि. २७ (वार्ताहर ) :दातार ग्रुपच्या ‘‘आनंदोत्सव 13 या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रोटरी कर्णबधीर मुलांच्या निवासी शाळेने यशस्वी सहभाग घेतला.
या क्रीडा स्पर्धेत एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रथम क्रमांकाची एकूण 08 बक्षिसे, द्वितीय क्रमांकाची 05 बक्षिसे तर तृतीय क्रमांकाची 05 बक्षिसे अशी एकूण 18 बक्षिसे मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सहभागी 10 विद्यार्थ्यांनी ‘शिव तांडव’ नृत्य सादर करुन प्रत्येकाचे मन रोमांचित करुन जिंकले. या नृत्याने 11,000 रुपयाचे रोख पारितोषिक मिळविले. या स्पर्धेमध्ये 10 शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत मतिमंद प्रवर्ग आणि कर्णबधिर प्रवर्ग होते. यामध्ये कर्णबधिर प्रवर्गातून रोटरी कर्णबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘शिवतांडव’ नृत्य प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
हे नृत्य शाळेच्या विशेष शिक्षिका सौ. कुंदा शेवाळे यांनी बसवले होते. तसेच विशेष सहकार्य सौ. मनिषा गुंजाळ, श्री. संजय होन, श्री. अशोक दहातोंडे, सौ. उषा पाटील, सौ. वासंती पाटील ह्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे मिळाले. तसेच सौ. रेश्मा नाईक, कु. साक्षी नाईक, सौ. तृप्ती राणे, सौ. संजना कांबळे, सौ. शैला वाघ, सौ. संजना सालेकर ह्या पालकांनी विशेष सहकार्य केले.अशा पध्दतीने शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका सौ. शैला बंदसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत अद्वितीय आणि अविस्मरणीय यश प्राप्त केले.ट्रस्टचे चेअरमन अरविंद सावळेकर, सेक्रेटरी प्रमोद वालेकर तसेच क्लबचे अध्यक्ष डॉ. जय भंडारकर, सेक्रेटरी ऋग्वेद कांडपिळे सर्व ट्रस्टींनी आणि रोटेरियन्सनी विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापिकांसह सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल