पनवेल दि.274kNews: शिवसेना (उभाटा) पनवेल मा. उपशहर प्रमुख तथा पत्रकार अनिल कुरघोडे यांना मातृशोक झाला असून आज पनवेल येथील अमरधाम समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.सौ सुशीला शिवाजी कुरघोडे यांचे आज सकाळी वयाच्या ८० व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पनवेल मधील अमरधाम स्मशानभूमीत राख सावरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर दहाव्याचा कार्यक्रम सावरकर चौक, बैलघाट, पनवेल येथे होणार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध पक्षाचे राजकीय पुढारी, नातेवाईक, सगे-सोयरे, पत्रकार आणि समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
Tags
पनवेल