केमस्पेक केमिकल्स लि.कंपनीला भीषण आग


केमस्पेक केमिकल्स लि.कंपनीला भीषण आग
पनवेल, दि.28 4kNews ः पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल्स लि.कंपनीला आज सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पडघे गाव येथील प्लॉट नं.3 सी या ठिकाणी असलेल्या केमस्पेक केमिकल्स लिमिटेड या रासायनिक कंपनीमध्ये फार्मा व कॉस्मेटीक कंपनीसाठी लागणारे केमिकल बनविण्यात येते. सदर कंपनीमध्ये आज सायंकाळी उशिरा अचानकपणे आग लागली. या आगीची माहिती मिळताच तळोजा औद्योगिक वसाहतीचे अग्नीशमन दलाचे बंब, कळंबोली, खारघर, पनवेल, सिडको येथील अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले व त्यांचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. 
या कंपनीला यापूर्वी सुद्धा आग लागल्याची माहिती समजते आहे. आगीत कंपनीचे नुकसान झाले असले तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही आहे. घटनास्थळी तळोजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तैनात होते. ही आग आजूबाजूला पसरु नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.थोडे नवीन जरा जुने