पोलीस ठाण्याच्या वतीने मच्छिमार बांधव व कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व बैठक संपन्न






पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मच्छिमार बांधव व कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व बैठक संपन्न 
पनवेल दि. २६ ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे गाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मच्छिमार बांधव व कुटुंबियांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाणेच्या वतीने व ओम हेल्थ कॆअर सेंटर कामोठे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.



                          वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तपासणी शिबिरामध्ये बीपी ,शुगर , प्रोटिन्स टेस्ट, इत्यादी आजारांबाबत तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरात एकूण 22 मच्छीमार बांधव, कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता . यावेळी आयोजित बैठकीमध्ये सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संशयित बोटी, ड्रोन, अनोळखी इसम, वाहन, तसेच बेवारस वस्तू, ईत्यादी माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे लॅंड लाईन क्र 02227452444 , व कोस्टल हेल्पलाईन क्रमांक 1093 यावर संपर्क साधावा याबाबत तसेच इतर महत्वाच्या देण्यात आल्या आहेत.सदर आरोग्य तपासणी शिबीर व सागर रक्षक बैठक पोनि जगदीश शेलकर यांनी घेतली होती. या बैठक व वैद्यकीय तपासणी शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला . 


थोडे नवीन जरा जुने