बंद खोलीत गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला एका इसमाचा मृतदेह



पनवेल दि.  दि.१८ डिसेंबर (4K News): पनवेल जवळील बम्बईपाडा येथील एका खोलीत गळा चिरलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . 



            सदर इसमाचे नाव रमेश हे असून अंदाजे वय ३५ ते ४० दरम्यान आहे . सदर इसम हा गेल्या काही दिवसापासून आजारी होता . तसेच मनोरुग्ण असल्याचे समजते व तो त्या भागातील एका कॉरीवर कामाला होता . 




त्याचा मृतदेह तेथे असलेल्या बैठया चाळीतील एका खोलीत गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे . तसेच त्याच्या मृतदेहाच्या बाजूला चाकू आढळला आहे . या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन आजूबाजूला या इसमाबाबत चौकशी सुरु केली आहे . या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . 






  


थोडे नवीन जरा जुने