पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे ओएनजीसी सिग्नलजवळ वाहतूक नियमांबाबत जनजागृती



     पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) : पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने वाहतूक नियम पाळण्याबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. 


त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे ओएनजीसी सिग्नल जवळ जनजागृती करण्यात आली.       पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व इतर अधिकारी अंमलदार यांनी ओएनजीसी सिग्नल येथे जन जागृतीसाठी वाहन चालक मालक यांना अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे अनुषंगाने त्या बाबत सूचना देऊन हेल्मेट परिधान करणे, सेफ्टी बेल्ट लावणे, सिग्नलचे पालन करणे, गाडी वेगात न चालविणे तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच वाहन चालक-मालक यांना थकीत चलन दंड रक्कम वेळेवर भरण्याबाबत सूचनाही दिल्या.

थोडे नवीन जरा जुने