एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी अकोल्यात झालेल्या डीएसओ स्कूल स्टेट चॅम्पियनशिपमध्ये केली चमकदार कामगिरी





पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News):  
एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी अकोल्यात झालेल्या डीएसओ स्कूल स्टेट चॅम्पियनशिपमध्ये केली चमकदार कामगिरी करून 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावून नावलौकिक मिळवले आहे.


        अकोला येथे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत झालेल्या डीएसओ स्कूल स्टेट चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या बॉक्सर्सनी 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले आहे.





 यामध्ये योगिनी पाटीलने 19 वर्षा मुलींखालील 54 किलो गटात सुवर्णपदक पटकावले आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणूनही गौरविण्यात आले. व्ही. के. हायस्कूलच्या उन्नती परदेशीने 19 वर्षांखालील मुलींच्या 57 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकले. 



तसेच अविक मुखर्जीने (रामशेठ ठाकूर हायस्कूलचा विद्यार्थी) 17 वर्षांखालील मुलांच्या गटात 66 किलो वजनी गटात रौप्य , शान उरणकर (व्हीके हायस्कूलचा विद्यार्थी) याने 80 किलो वजनी गटात 17 वर्षांखालील मुलांमध्ये रौप्य पदक तर केव्ही कन्या हायस्कूलची मुलगी दुर्पता सौद हिने १७ मुलींखालील ४४ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत अद्वैत शेंबवणेकर यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. 


थोडे नवीन जरा जुने