१७ वर्षीय तरुणाचे अपनयन

  पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) :मित्राकडे जातो असे सांगून एक १७ वर्षीय तरुण घराबाहेर पडला असून तो अद्याप घरी न परतल्याने त्यांचे अज्ञात इसमाने फिर्यादीचे संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतुन अपनयन केल्याचा गुन्हा खारघर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 


           रोशन अजय सिंग (वय-१७) असे या तरुणाचे नाव असून हा त्याचा मित्र बिलाल याचे घरी जातो असे सांगून घरातुन गेला तो अदयाप पावेतो घरी परत न आल्याने त्याचे कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतुन अपनयन करुन घेवुन गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या तरुणाचा रंग गोरा, उंची अंदाजे ४ फुट ५ इंच, चेहरा उभट, डोळे, काळे, गळयात काळया रंगाचा धागा पातलेला, त्याला भाषा-हिंदी, मराठी भाषा अवगत असून त्याने अंगात हिरव्या रंगाचा टि शर्ट व काळया रंगानी पॅन्ट, पायात पांढऱ्या रंगाची चप्पल घातलेली असून त्याच्या हातावर एस नाव इंग्रजीमध्ये गोंदलेले आहे. या तरुणबाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खारघर शहर पोलीस ठाणे किंवा मपोहवा शीतल खुटे यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने