तलोजा फेस १ व फेस २ नावडे खारघर तळोजा गाव परिसरात होणाऱ्या वायू गळती संदर्भात कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी




पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) संजय कदम): पनवेल तालुक्यातील तलोजा फेस १ व फेस २ नावडे खारघर तळोजा गाव परिसरात होणाऱ्या वायू गळती संदर्भात कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच ख्याधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याना निवेदनाद्वारे केली आहे. 


        या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, पनवेल महानगरपालिका परिक्षेत्रातील तलोजा फेस १ व फेस २ नावडे खारघर तळोजा गाव परिसरात रात्रीच्या सुमारास नावडे औद्योगिक परिसरातील केमिकल कंपनीच्या वायु गळतीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तसेच सामान्य नागरिकांच्या आरोग्याला कायमस्वरूपी धोक्या निवारण करण्यात यावा .
यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व मुख्याधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निवेदन द्वारे कळविण्यात आले आहे यावर कुठलीही उपाययोजना झाली नाही पनवेल शेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन घेण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे.




थोडे नवीन जरा जुने