भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


                                      

पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नालंदा बुद्धविहार ट्रस्ट कामोठे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत भाजपचे मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. 





          गेल्या १८ वर्षांपासून नालंदा बुद्धविहार ट्रस्ट कामोठेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामोठे येथील नालंदा बुद्धविहारच्या मैदानावर अभिवादन सभा आयोजित करण्यात येते. 


 मंगळवारी रात्री १२ वाजता दरवर्षीप्रमाणे यंदाही या अभिवादन सभा तसेच कँडल मार्च द्वारे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.






 यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या सभेस ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, नालंदा बुद्धविहार ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, सरचिटणीस ऍड. मंगेश धिवार, कार्याध्यक्ष सुनील जोगदंड, यांच्यासह हजारोच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. 




थोडे नवीन जरा जुने