पनवेल भाजपा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे,
 माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकिद काझी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, प्रवीण खंडागळे, रमेश पाटील, सुनील पाटील, विश्वजित पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. 

थोडे नवीन जरा जुने