डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अलिबाग/प्रतिनिधी पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News)
 भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय अलिबाग येथे अभिवादन करण्यात आले. 
6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’’ म्हटलं जातं. 

भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
- अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या.

- डॉ. आंबेडकर यांच्या ‘The Problem of the Rupee – Its origin and its solution’ पुस्तकाच्या आधारावर ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ची पायाभरणी झाली.
6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.
भारतीय घटनेचे शिल्पकार शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जगभरात अभिवादन करण्यात येते. बाबासाहेबांच्या कार्याच्या स्मृतींना या अभिवादनातून उजाळा देण्यात येतो. आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय अलिबाग येथे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले 
यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रताप सातव, निरीक्षक शरद जाधव, निरीक्षक सुनील साळुंखे, निरीक्षक सुशील मोरे, निरीक्षक रवी स्वामी, वरीष्ठ लिपिक सुरेंद्र गारले,कनिष्ट लिपिक अनिल वाडेकर, कनिष्ट लिपिक अमर घाडगे, लेखापाल कांचन कदम, दप्तरी दिनेश मोरे, आदेशिका वाहक विनय तांडेल, शिपाई निलेश नागरे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने