आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून पारगाव गावासाठी वीस लाख रुपये निधी खर्चून उभारण्यात येणार समाज हॉलपनवेल दि. १२डिसेंबर (4K News) : उरण विधानसभा मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी  यांच्या आमदार निधितून पारगाव गावातील खालच्या आळीत लग्न कार्य तसेच इतर कार्यांसाठी समाज हॉल मंजूर करण्यात आला असून त्यासाठी वीस लाख रुपये निधी देण्यात आला आहे  

              सदर  समाज हॉल चे भूमिपुजन   ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले .

 यावेळी  माजी सरपंच महेंद्र पाटील,  ग्रामपंचायत सदस्य संकल्पना राजेश तारेकर,  माजी सरपंच तथा सदस्य निशा रत्नदीप पाटील,  माजी उपसरपंच तथा सदस्य मनोज दळवी,  माजी उपसरपंच रत्नदीप पाटील तसेच माजी सरपंच शंकर शेठ म्हात्रे, माजी सरपंच विश्वनाथ म्हात्रे  व  गावातील कार्यकर्ते निरंजन तारेकर, राजेश तारेकर आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 


 
थोडे नवीन जरा जुने