रस्ता सुरक्षा महीना अभियान 2024 च्या अनुषंगाने रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना बसवून देण्यात आले रिफ्लेक्टर


रस्ता सुरक्षा महीना अभियान 2024 च्या अनुषंगाने रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना बसवून देण्यात आले रिफ्लेक्टर
पनवेल दि. १९(संजय कदम): रस्ता सुरक्षा महीना अभियान 2024 च्या अनुषंगाने रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून देण्याचा उपक्रम कळंबोली वाहतूक शाखेतर्फे राबवण्यात आला .                 रस्ता सुरक्षा महीना अभियान 2024 च्या अनुषंगाने कळंबोली वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर, पोलीस उपनिरीक्षक भद्रे, पोलीस उपनिरीक्षक साठे व पथकाने कळंबोली सर्कल येथे रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना अडवून त्यांना रिफ्लेक्टर बसवून देण्यात आले तसेच वाहन चालक व मालक यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबवणे बाबतची पार्श्वभूमी व वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करता येईल याबाबत प्रबोधन केले.या उपक्रमाचे वाहतूक मालक व चालकानी कौतुक केले आहे . 


थोडे नवीन जरा जुने