बाबासाहेब लीगल पँथर K G F कायदेशीर गण रक्षक फौज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आधार कार्ड शिबीर संपन्न






बाबासाहेब लीगल पँथर K G F कायदेशीर गण रक्षक फौज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आधार कार्ड शिबीर संपन्न 
पनवेल दि १४, (संजय कदम) : ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची संयुक्त जयंती तसेच 14 जानेवारी मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाचे औचित्य साधून आयोजित आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 




               छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि प्रेरणेतून उदयास आलेले बाबासाहेब लीगल पँथर K G F कायदेशीर गण रक्षक फौज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवीन पनवेल या ठिकाणी आधार कार्ड नवीन नोंदणी करणे तसेच आधार कार्ड अपडेट करणे शिबिर आयोजित करण्यात आले होते.. सदर शिबिराला स्थानिक लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि शिबिराचा लाभ घेतला. यावेळी जेष्ठ रिपब्लिकन नेते नरेंद्र गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रफुल भोसले, ऍड.नीलम भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने