पनवेल महापालिकेचे मा. नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश; मालधक्का येथील नवीन पाईप लाईनच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल दि.१९(संजय कदम): पनवेल महापालिकेचे मा. नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मालधक्का येथील नवीन पाईप लाईनच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. 
            मालधवका वसाहत, नवनाथनगर वसाहत येथे ३ इच पाईपलाईन बदलून ८ इव पाण्याची पाईपलाईन टाकून मिळणेबाबत मा नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिके;ला निवेदन दिले होते. त्यामध्ये त्यांनी प्रभाग १७ मधीत असलेल्या मालधक्का वसाहत, नवनाथनगर वसाहत येथे नागरिकाची संख्या जास्त आहे. 
पाण्याची पाईप लाईन लहान असल्यामुळे पाण्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे सदर मालधक्का वसाहत, नवनाथनगर वसाहत या विभागातील नागरिकाच्या मागणीवरून पाण्याची पाईप लाईन मोठी बसवून देण्यात यावी अशी मागणी करून पाठपुरावा केला होता. चाफ्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून मालधक्का येथील नवीन पाईप लाईनच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.


थोडे नवीन जरा जुने