पनवेल दि.१९(संजय कदम): संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवीवर्ष निमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद्भागवत कथेचे आयोजन पनवेल जवळील खारघर येथील सेंट्रल पार्क येथे ४ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संपन्न होणार आहे.
सदर होणाऱ्या भव्य दिव्य विराट अखंड राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहचा श्रीफळ शिवसेना(उभठा) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील अनेक वारकरी संप्रदायाचे मोठं मोठी व्यक्तिमत्वे सहभागी होणार असून त्यांचे अभंग कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम दररोज संपन्न होणार आहेत. तरी पनवेल तालुक्यातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा अध्यक्ष हभप मोहन महाराज म्हात्रे यांनी केले आहे.
Tags
पनवेल