पत्रकार दिनाचे औचित्य साधून मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी यांचा सन्मानपत्रकार दिनाचे औचित्य साधून मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी यांचा सन्मान
पनवेल दि.०८(वार्ताहर): पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार उत्कर्ष समितीने मुंबई, ठाणे नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण, कर्जत, खालापूर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक हॉल पनवेलमधील निलाताई पटवर्धन सभागृह येथे झाला. यावेळी मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी याना पुरस्कार देऊन मान्यवरांच्याहस्ते सनमानीत करण्यात आले.          पत्रकार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन स्वामी समर्थ परमपूज्य श्री रामदासजी महाराज यांनी केले. या पत्रकार सन्मान सोहळ्याला स्वामी समर्थ रामदासमहाराज, जितेंद्र तिवारी, एस.सी. मिश्रा आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, प्रदेश सचिव वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सहसचिव ज्ञानेश्वर कोळी, अशोक घरत, अलंकार भोईर यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी उत्कर्ष समितीकडून विद्यार्थी गुणगौरव, महिलांचा सन्मान, वृक्षारोपण, रक्तदान आदी वर्षभर करीत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली

कार्यक्रमात मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी, 'सागर'चे पत्रकार विजय मोकल, सा. रसायनी टाईम्सचे संपादक अनिल भोळे, सा. झुंजार मतचे संपादक अजित पाटील, ज्येष्ठ पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार मिलिंद खारपाटील, लालचंद यादव, महामुंबई चॅनेलच्या तृप्ती भोईर यांच्यासह इतर काही पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.थोडे नवीन जरा जुने