लायन्स तर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल दि.०९(संजय कदम): लायन्स डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 ची टॅलेंट हंट कमिटी, लायन्स क्लब ऑफ पनवेल, लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि पनवेल बुद्धिबळ असोसिएशन, यांचे संयुक्त विद्यमाने खुली बुद्धिबळ स्पर्धा पनवेल येथे गोखले सभागृहामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये 160 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
           सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी प्रांतपाल ला. मुकेश तनेजा यांचे हस्ते पार पडले तर बक्षीस समारंभ द्वितीय प्रांतपाल ला. संजीव सूर्यवंशी यांचे हस्ते संपन्न झाले. डिस्ट्रिक्ट कमिटी टॅलेंट हंट चे ला. सुयोग पेंडसे यांनी कमिटी तर्फे समाजातील गुणवत्ता शोधण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करत असल्याचे सांगितले. उद्घाटक ला. मुकेश तनेजा आणि मुख्य अतिथी ला. संजीव सूर्यवंशी यांनी या स्पर्धांच्या आयोजना बद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट खजिनदार नयन कवले, जीएसटी चेअरमन प्रवीण सरनाईक, जी एल टी चेअरमन नमिता मिश्रा, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी विजय गणात्रा, आलोक मिश्रा, पनवेल
 लायन्स अध्यक्ष सीताराम चव्हाण, पनवेल सरगम अध्यक्ष स्वाती गोडसे, कमिटी को ऑर्डिनेटर संजय गोडसे, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम तसेच माजी उप नगराध्यक्ष मदन कोळी यांनी स्पर्धेला भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बुद्धिबळ असोसिएशन चे समीर परांजपे, पाटील सर तसेच लायन्सचे अशोक गिल्डा, सुरभी पेंडसे, अलका चव्हाण, सुनील देशपांडे, संध्या महानुभाव आणि सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने