रेझिंग डे सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र संदर्भात तसेच सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा बाबत देण्यात आली माहिती


रेझिंग डे सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र संदर्भात तसेच सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा बाबत देण्यात आली माहिती
पनवेल दि.०९(संजय कदम): रेझिंग डे सप्ताह अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र तसेच सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा बाबत माहिती देण्यात आली.         पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने वाजे हायस्कूल येथील सातवी ते दहावीचे विद्यार्थी/ शिक्षकवर्ग यांना पोलीस वर्धापन दिन बाबत ,पोलीस स्टेशनची कार्यपद्धती, सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा, गुड टच बॅड टच व यापासून घ्यावयाची काळजी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून मुलांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी वेळी हायस्कूलचे एकूण 100 ते 125 विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग उपस्थित होता यावेळी पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

थोडे नवीन जरा जुने