हल्लेखोरांवर कारवाई करावी तसेच व्यावसाविक गाळ्याचा धारदार शस्त्र ठेवण्यासाठी वापर होत असल्यामुळे अनधिकृत झोपडपट्‌टीवर बुलडोझर कारवाई करण्याची सकल हिंदू समाजाची पोलिसांसह महानगरपालिकेकडे मागणीहल्लेखोरांवर कारवाई करावी तसेच व्यावसाविक गाळ्याचा धारदार शस्त्र ठेवण्यासाठी वापर होत असल्यामुळे अनधिकृत झोपडपट्‌टीवर बुलडोझर कारवाई करण्याची सकल हिंदू समाजाची पोलिसांसह महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल दि.२५(वार्ताहर): हल्लेखोरांवर कारवाई करावी तसेच व्यावसाविक गाळ्याचा धारदार शस्त्र ठेवण्यासाठी वापर होत असल्यामुळे अनधिकृत झोपडपट्‌टीवर बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आज सकल हिंदू समाजाच्यावतीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पनवेल महानगरपालिकांचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सकल हिंदू समाजाच्यावतीने निलेश पाटील, नितीन पाटील, परेश मुरबाडकर,संजय मुरकुटे, भूषण पोवळे, चिन्मय समेळ, समीर कदम, प्रितम म्हात्रे, केतन ठाकरे, परेश चोणकर, आकाश घाटे, सुमित झुंजारराव, संजय कदम, विशाल सावंत, मयुरेश नेतकर, रोहित जगताप, रुपेश नागवेकर, प्रभाकर बहिरा, कुणाल जाधव, राकेश पोटे, कोमल कोळी, हर्षदा सोळंकी, निकिता फडके, अपूर्वा सावंत यांच्यासह मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते.
          यावेळी बोलताना निलेश पाटील यांनी सांगितले की, २२ जानेवारी २०२४ रोजी शहरातील युवकांवर काही समाजकंटकांनी ठार मारण्याच्या उद्देशाने भ्याड हल्ला केला. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. तो हल्ला 25 ते 30 जणांच्या जमावाने केला होता. पण आतापर्यंत केवळ तीन जणांनाच अटक करण्यात आली असल्याचे समजते. उर्वरित आरोपींना अद्याप मोकळे रान का देण्यात आले आहे? हा प्रश्न पनवेलमधील समस्त हिंदू समाजाला पडला आहे. त्यांच्यावरही कारवाई करून अटक करावी अशी प्रथम मागणी आहे.या हल्ल्यात त्या हल्लेखोरांनी हल्ला करण्यासाठी धारदार शस्त्र व अन्य घातक शस्त्र एका व्यावसायिक गाळ्यात साठवून ठेवली असल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे ही शस्त्र कोठून आली ?याची चौकशी देखील होणे आवश्यक आहे.तसेच ही शस्त्रे ज्या गाळ्यात ठेवण्यात आली होती त्या गाळे मालकाची देखील चौकशी करावी. त्याचा आणि हल्लेखोरांचा कोणता संबंध आहे? तो गाळा अधिकृत आहे किंवा कसे याबाबत चौकशी करावी. आमच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. अश्याच प्रकारचे निवेदन आयुक्त गणेश देशमुख यांना देऊन हल्ल्यादरम्यान आरोपींनी वापरलेली हत्यारे एका गाळ्यामध्ये ठेवली होती. व्यावसायिक गाळ्याचा वापर दंगे पसरवण्यासाठी, धारदार शस्त्र साठवून त्याचा वापर हत्येचा प्रयत्न करण्यासाठी करण्यात आला होता
. तसेच तो व्यावसायिक गाळा आपल्या परवानगीने बांधण्यात आला आहे किंवा कसे याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्या गाळ्यात बुलडोझर एक्शन करावी जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचे कृत्य करणार नाही. त्याच प्रमाणे शहरात सूरू असलेल्या चर्चेनुसार, जुन्या कोर्ट च्या मागे भारतनगर सारख्या अनधिकृत झोपडपट्टी मध्ये बांगलादेशी लोक राहत आहेत असे निदर्शनास येत आहे . तरी आपण येत्या दहा दिवसांत अशा अनधिकृत झोपडपट्टी हटवा अशी मागणी आम्ही सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आली असून अन्यथा सकल हिंदू समाज पनवेलमधील मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत बांधकामे करायला सुरू करेल असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाची पत्र राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने