महिला बेपत्ता

पनवेल दि.२५(वार्ताहर):  राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहित महिला कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 
          रशिदा खातून शमशुद्दीन हुसैन(वय २९) असे या महिलेचे नाव असून तिची उंची ५ फूट ४ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे, केस लांब काळे असून अंगात लाल रंगाचा टॉप व पायजमा घातला आहे. तसेच तिला हिंदी भाषा अवगत आहे.  या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाणे ०२२-२७४१२३३३ किंवा पोलीस हवालदार मुकेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने