मालेवाडीतील कार्तिक्य पार्क सोसायटीने जपला राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेनचा वारसा





मालेवाडीतील कार्तिक्य पार्क सोसायटीने जपला राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेनचा वारसा
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेवुन स्थापन झालेली कार्तिक्य पार्क संयुक्त जयंती महोत्सव समिती अयोजित ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता मॉ साहेब जिजाऊ यांची संयुक्त जयंती पनवेल, मालेवाडी येथिल कार्तिक्य पार्क रहिवासी सोसायटी मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.






                       कार्यक्रमा ची सुरुवात दोनी आदर्श मातांच्या प्रतिमा पूजन करुण तर अ‍ॅड. नीलमताई भोसले व सोसायटीतील महिलाच्या हस्ते दिप प्रज्वलित करुण करण्यात आली. कार्यक्रमात सोसायटीतील महिला व विद्यार्थी मित्रांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला आणि विद्यार्थी मित्रांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या जीवनपटावर आपले विचार सर्वांन समोर मांडले.प्राध्यापक प्रफुल्ल भोसले यांच्‍या मार्गदर्शना खाली हा जयंती उत्सव घेण्यात आला तसेच प्रा.भोसले यांनी प्रबोधनात्मक विचार मांडून उपस्थीतांची मने जिकली



. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सातपुते आणि दयानंद वाघमारे यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृणाल कदम, तानाजी जायगुडे, निवेदन देठे, यशवर्धन भगत, सतीश कर्डक, प्रशांत भोसले, यानी विषेश मेहेनत घेतली. तसेच सोसायटीचे अध्यक्ष तायडे साहेब , सेक्रेटरी सागर जगताप , सदस्य मुंगसे साहेब, परेश नाईक, नंदकुमार जाधव वा सोसायटी मधील रहिवाशी यांनी कार्यक्रमास उपस्थीत राहून विद्यार्थी मित्रांना प्रोस्ताहन दिले.


थोडे नवीन जरा जुने