पनवेल दि.२२(संजय कदम): आज राम लल्ला प्राण प्रतिष्ठाण सोहळ्या निमित्त 'निल्स लेक व्हू' सोसायटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. जयंत देशपांडे सर यांची उपस्थिती ही या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. जयंत देशपांडे सर हे स्वतः UNICEF चे राज्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
वारकरी संप्रदायाचे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. श्री. देशपांडे सरांचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिकित्सा स्वरूपात पुस्तक प्रकाशित झालेले आहे. श्री. देशपांडे हे एक प्रचंड व्यासंग, चिंतन असलेले व्यक्तिमत्व आहे. श्री. देशपांडे सरांनी आज 'निल्स लेक व्हू' सोसायटीत येऊन प्रभू राम चंद्राच्या चरणी प्रवचन रुपी सेवा दिली. आज सोसायटीतील सदस्यांसाठी त्यांना ऐकण्याची संधी म्हणजे पर्वणी होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे चेअरमन, सदस्य आणि राम भक्त मोठ्या प्रमाणावर एकत्र आले.भजन आणि राम रक्षा सामूहिक पठण होऊन प्रसादाचा कार्यक्रम झाला.संपूर्ण दिवस भक्तीमय वातावरण होते.
Tags
पनवेल