आ.प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्यामुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन







आ.प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्यामुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन
पनवेल चँपियन लिग चे केदार भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यामुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन पनवेल शहर मंडल भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत यांनी केले.ते टीआयपीएल प्रस्तुत पनवेल चँपियन लिग 2 चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.



                        भगत पुढे म्हणाले की,ही लिग पनवेलकरांसाठी पर्वणी असते.पनवेलमधून अनेक मोठे खेळाडू होऊन गेले.उदयोन्मुख खेळाडू देखील पनवेलचे नाव उंचावत आहेत.अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणे पनवेलकरांचे भाग्य आहे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी पनवेल युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, सुमित दसवते, आयोजक राजू पटेल , वासिम मस्ते , नुमान पटेल ,अलताब मास्टर,वासिम पटेल उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने