महेश पाटील यांना धिरूभाई अंबानी स्मृती "उद्योगरत्न" गौरव पुरस्कारमहेश पाटील यांना धिरूभाई अंबानी स्मृती "उद्योगरत्न" गौरव पुरस्कार
पनवेल ता.7(बातमीदार) प्रशिक एज्युकेशन सोसायटी तर्फे दिला जाणारा यांना पुरस्कार प्रदान
पनवेल दि ०७ (संजय कदम) : विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल प्रशिक एज्युकेशन सोसायटी ने दखल घेऊन यंदाचा
धिरूभाई अंबानी स्मृती "उद्योगरत्न" गौरव पुरस्कार तोंडरे गावचे सुपुत्र व भारतीय जनता पक्षाचे युवा नेते महेश राघोशेठ पाटील यांनापुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. प्रशिक एज्युकेशन सोसायटी देवीचा पाडा नावडा पनवेल येथील आयोजित कार्यकमात अनेक मान्यवरांना विविध समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महेश पाटील यांच्या कार्याची दखल घेवून यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील भरीव कामा बद्दल आयोजक मोहन गायकवाड यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र सचिव अरुण जाधव, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पनवेल येथील मनोज कांबळे, भरत दातार, मुंबई चेंबूर येथील सुमित हिरवे, रमेश रुपवते हे त्यावेळी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने