सौ.प्राप्ती ठाकूर आगरी समाजातील पहिल्या महिला कमर्शियल पायलट मा विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले अभिनंदन






पनवेल दि.१७ (वार्ताहर): सरला ठकराल या विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. १९३६ साली त्यांनी म्हणजेच २१व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले. दुर्गा बॅनर्जी या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक पायलट आहेत


. एअर सर्व्हे ऑफ इंडियामध्ये सामील झाल्यानंतर कॅप्टन दुर्गा बॅनर्जी यांनी 1956 मध्ये कलकत्ता येथे इंडियन एअरलाइन्समध्ये प्रवेश केला, जिथे त्या भारताच्या पहिल्या महिला व्यावसायिक पायलट बनल्या.
  पनवेल परिसरात सुद्धा झपाट्याने विकास होत आहे त्यावेळेस येथील तरुण पिढी सुद्धा नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षणामध्ये मागे नाही. श्री व सौ.रजनी भरत चांगू ठाकूर यांची सुकन्या आणि श्री. व सौ. योगिता दीपक ठाकूर यांची सून सौ. प्राप्ती राज ठाकूर या कमर्शियल पायलट बनून आगरी समाजातील पहिल्या महिला पायलट झाल्या त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम जे. म्हात्रे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

.

थोडे नवीन जरा जुने