2 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या सिमेंटचा अपहार करणार्‍या दोघा आरोपींना पनवेल तालुका पोेलिसांनी घेेतले ताब्यात






पनवेल, दि.21 (संजय कदम) ः 2 लाख 82 हजार 322 रुपये किंमतीच्या 32.920 टन सिमेंटचा अपहार करणार्‍या दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील नवकार लॉजिस्टीक कंपनी कोन गाव पनवेल ते अमित इन्फ्रा लॉजिक इंडिया प्रा.लि. तुर्भे दरम्यान आरोपी संदीपकुमार सरोज (28 रा.रायबरेली) व त्याचा सहकारी भिमाशंकर पुजारी (27 रा.चेंबुर) तसेच इतर 3 आरोपी यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या ताब्यात दिलेला 2 लाख 82 हजार 322 रुपये किंमतीच्या 32.920 टन सिमेंटचा माल हा इच्छितस्थळी न पोहोचविता तो ट्रकमधून काढून घेवून त्याची विक्री करून स्वतःच्या फायद्याकरिता सदर मालाचा अपहार केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच 




वपोनि अनिल पाटील व गुन्हे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे, पो.हवा.विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, पो.शि.आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेत असताना सदर आरोपी हे उत्तरप्रदेश येथील जगतपूर, रायबरेली या ठिकाणी जावून लपल्याचे माहिती मिळताच या पथकाने तात्काळ जगतपूर पोलीस ठाणे यांची मदत घेवून सदर ठिकाणी सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत केला आहे.




थोडे नवीन जरा जुने