पनवेल /८ प्रतिनिधी
१९७९ साली सुषमादेवी मुंबईला आल्या. त्यावेळी कश्मीरा कॅसेटस्टोन कंपनीने माझ्या भीमाच्या नावाचा कुंकू लाविला रमाने हे गाणे ध्वनिमुद्रित केल्यावर सुषमादेवी सर्वांना परिचित झाल्या भीमकोकिळा म्हणून संबोधल्या जाणा-या गायिका सुषमादेवी यांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांच्या हस्ते सचिव शंकर वायदंडे माजी नगरसेवक गणेश कडू ,सारिका भगत, डॉक्टर सुरेखा मोहकर ,सुनील वानखेडे राम बोरीले यांच्या प्रमुख उपस्थितीत माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सुषमादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नजीकच्या एका खेड्यात झाला. वडील जगन्नाथ जावळे आणि आई वंचलाबाई यांना गाण्याची आवड होती. गाणी गाऊन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे आईवडील तबलापेटी सोबत घेऊन गाणी गात कुटुंबासोबत फिरस्ती करायचे. लहानपणी गायनाचे धडे आईवडिलांकडूनच मिळाले आहेत कव्वाली हा प्रकार त्यांना चांगला अवगत आहे. भीमगीतांच्या कव्वालीचा सामना त्या रंगवू लागल्या. गोविंद म्हशीलकर, प्रल्हाद शिंदे, नवनीत खरे, भीकू भंडारे यासारख्या आघाडीच्या कव्वाली गायकांसोबत त्यांचे संगीत कार्यक्रम खूप गाजले आहेत. लाखो भीम चाहते त्यांचे जगभर असल्याने त्यांच्या कलेची दखल घेत त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
Tags
पनवेल