मराठा महोत्सवाचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शानदार उदघाटन


पनवेल दि.०७ (वार्ताहर): कामोठे वसाहती मध्ये एमपॉवर सामाजिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिव जयंती निमित्त मराठा महोत्सवाचे उदघाटन मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या हस्ते आज करण्यात आले. 
एमपॉवर सामाजिक विकास संस्थेच्या मार्फत ७ ते १३ फेब्रु२०२४, कालावधीत शिवजयंती निमीत्त, मराठ्यांची भीमथडी, मराठा महोत्सव २०२४, कामोठे पोलीस स्टेशन ग्राउंड वर आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
या वेळी उपस्थितांना संबोधताना मी गद्दारी करणार नाही, ओबीसीतून आरक्षणाचा कायदा होत नाही तोवर लढा सुरूच ठेवणार असे म्हटले. मराठी माणूस व्यवसायात पुढे जावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने काम करणाऱ्या एमपॉवर सामाजिक विकास संस्था, मराठा सेवा संघ प्रणित-मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शक संस्था, खारघर मराठा समाज, सकल मराठा समाज मंडळ (खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, करंजाडे, पनवेल), मराठा उद्योजक लॉबी, मराठा व्यवसाय संघ, मराठा बिझनेस असोसिएशन यांच्या आयोजनात व अनेक बांधवांच्या सहकार्याने मराठी तरुणांना, कुटुंबांना पुढे घेऊन जाण्यासाठी वेळोवेळी आयोजक प्रयत्नशील आहेत 
अनेक वेळा व्यावसाय मार्गदर्शन तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज विषयक मार्गदर्शन, विविध मराठमोळे कार्यक्रम करत मराठ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या बांधवांनी आयोजित केलेल्या मराठा महोत्सव मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन सेवा, डान्स धमाका, शिवशाहीची ललकार, महिला मेळावा, शिवशंभो गौरवगाथा, बाप समजून घेताना, सांस्कृतीक कार्यक्रम, मराठ्यांची मुलुख मैदानी तोफ व्याख्यान, प्रशासकीय सेवा सन्मान सोहळा, सोलो डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, अशा विविध कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी जीव गेला तरी चालेल पण गद्दारी करणार नाही.मराठा समाजातील मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. सकल मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत एकी कायम ठेवली पाहिजे. येत्या दहा तारखेच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दया, असे भावनिक आवाहन मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कामोठे येथे केले. यावेळी ई एम पॉवर संस्थेचे शहाजीराजे भोसले, सकल मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, रामदास शेवाळे, माजी नगरसेवक लीना गरड यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यक्रमाचे आयोजक, पनवेल तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी आयोजकांनी जरांगे पाटील यांना बळीराजाचे प्रतीक नांगर, लढाऊपणा दर्शवणारी तलवार व व्यवसायाशी निगडित तराजू भेट दिली. जरांगे पाटील यांनी तलवार उपसून महोत्सवाचे प्रतीकात्मक उद्घाटन केले. 


खूप संघर्षानंतर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे सगेसोयरे अधिसूचनेच्या आधाराखाली राज्यातील लाखो मराठा समाजाचा नोंदी मिळाल्या आहेत. हे सकल मराठा समाजाच्या लढ्याचे यश आहे. सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रतीक्षा आहे. आरक्षण व व्यवसायाच्या माध्यमातून मराठा समाज प्रगतीपथावर जाणार आहे विरोधकांनी सोशल मीडियावर कितीही प्रचार केला तरी मराठ्यांच्या एकीमुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.                              *मनोज जरांगे पाटील यांनी दिली खारघर येथील वारकरी अधिवेशनाला भेट*
               खारघर मधील सेंट्रल पार्क मैदानात राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशनाला आज मनोज जरांगे यांनी धावती भेट दिली. या महाअधिवेशनाला लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव खारघर याठिकाणी उपस्थित राहत आहेत. राज्यभरातील वारकरी बांधव या अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहत आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभगवत महापुराण कथेचे याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जरांगे यांचे महाविकास आघाडीचे नेते शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, मा. आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, हभप महादेव शाहबाजकर, माजी उपनगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे आदींसह वारकरी संप्रदायाचे वारकरी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने