पनवेल दि.०८ (वार्ताहर): रॉयल एज्युकेशनल सोशल अँड वेल्फेर असोसिएशन पनवेल तर्फे डॉ. आनंद आंबेकर रत्नागिरी, संदीप वाघमारे देवद, विजय वाघमारे देवद यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पनवेल तालुक्यातील देवद हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ आनंद आंबेकर हे गेली २५ वर्ष गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. समाजशास्त्र आणि पायाभूत अभ्यासक्रम विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल विकास विभागात अभ्यासक्रम शिकवत असताना मैत्री पूर्ण संबंध आणि शिस्तबध्द व्यवस्थापन यांची सांगड घालून डॉ. आनंद आंबेकर विद्यार्थ्यांमध्ये कायमच लोकप्रिय आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंता जाकीर पालेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले . संदीप वाघमारे देवद ग्रामपंचायत सदस्य यांना त्यांच्या सामाजिक, व्यावसायिक व क्रीडा क्षेत्रातील भरीव
कामगिरीबद्दल शिवसेना उप विभाग प्रमुख जयंत पाखरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.,तसेच विजय वाघमारे उप सरपंच देवद यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल केंद्रीय विद्यालय पनवेल चे प्राद्यापक राम कुमार सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अश्या प्रयोगशील समाजाची भावनिक जाणीव असनाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. रॉयल एज्युकेशन सोशल आणि वेलफेअर असोसिएशन गेली १० वर्ष शैक्षणिक आणि शहरी ग्रामीण आणि आदिवासी भागात सामाजिक काम करणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आहे. संस्था प्रमुख नाझनीन पालेकर यांनी त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्य पाल यांच्या तर्फे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Tags
पनवेल