पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाई सुरू केली होती संपूर्ण वर्षामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना नोटीस देखील भारंबे यांनी दिल्या आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ४११ नायजेरियन नागरिकांसह ५०६ परदेशी नागरिकांचा शोध घेतला असल्याचे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. या व्यक्ती एकतर योग्य कागदपत्रांशिवाय भारतात आले होते किंवा त्यांच्या व्हिसाची मुदत संपली होती.
तसेच या परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर छापा टाकत असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. 411 नायजेरियन पैकी बरेच जण अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे परदेशी राहणाऱ्या घरमालकांवरही कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एकूण ४८३ परदेशी नागरिकांना देश सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याचे भारंबे यांनी सांगितले.
Tags
पनवेल