खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य राष्ट्रीय अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात







खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य राष्ट्रीय अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
पनवेल दि. ०५ (संजय कदम) : संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड ठाणे नवी मुंबई वारकरी संप्रदायाच्या वतीने खारघरच्या सेंट्रल मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी अनंतश्री विभूषित द्वारका शारदा पिठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री सदानंद सरस्वती जी महाराज यांच्या पाद्यपूजेचा शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांना मिळाला आहे.





             खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असून यात श्रीमद्भागवत महापुराण कथा वाचन तसेच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन देखील संपन्न होणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक ह भ प धनाजी महाराज पाटील,माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कमिटी चे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या समवेत प्रमुख आयोजक उपस्थित आहेत. या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून ४ ते १२ फेब्रुवारी दरम्यान भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून रोज १ लाख भाविक या सोहळ्यात येणार आहेत. सेंट्रल पार्क मैदानावरती ३००० तंबू उभारलेले असून त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. ५००० टाळकरी,३००० पखवाज वादक तर ५००० ज्ञानेश्वरी वाचक रोज याठिकाणी असणार आहेत. 



भाविकांना सोहळ्याचा आनंद घेता यावा व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आरामशीर बैठक व्यवस्था,मुबलक वाहन पार्किंगची सोय,मुबलक पिण्याचे पाणी,सार्वजनिक शौचालये,प्रथमोपचार अशी जय्यत तयारी आयोजकांनी केलेली आहे.विशेष म्हणजे भाविकांना संत दर्शन व्हावे या उद्देशाने परमाद्य परमधर्माधीश उत्तरामनाय ज्योतिष्पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, अनंतश्री विभूषित द्वारका शारदा पीठाधीश जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चल आनंद सरस्वतीजी,गोवर्धन पीठ, पुरी ,ओडिषा, जगद्गुरु शंकराचार्य मलकपिठाधीश स्वामी श्री राजेंद्र दासजी महाराज या प्रभूतींचे आगमन होणार आहे. ह भ प धनाजी महाराज, ह भ प मोहन म्हात्रे, ह भ प संतोष केणे, ह भ प हनुमान महाराज, ह भ प नरहरी महाराज, ह भ प पद्माकर महाराज, ह भ प संजीव घरत, ह भ प गोरखनाथ घाडगे, आदींची उपस्थिती लाभणार आहे. 



थोडे नवीन जरा जुने