पनवेल दि २८, ( संजय कदम ) : खेलो इंडिया नॅशनल सायकलिंग स्पर्धा चेन्नई येथे संपन्न होऊन खारघरच्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने खेलो इंडिया नॅशनल सायकलिंग स्पर्धेत ब्रॉंझ मेडल व तीन लाख रू पटकाविले आहे .
चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन झाले असुन सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत खारघर ची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने ब्रॉंझ मेडल व तीन लाख रू रोख पटकवले, खेलो इंडिया स्पर्धेत भारतभरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्नेहल माळी चे वडील रसायनी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे अध्यक्ष अड विक्रम रोठे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष आणि संघटन सचिव प्रताप जाधव, सचिव प्रा. संजय साठे, खजिनदार भिकन आंबे यांनी अभिनंदन केले.
फिनिक्स सायकलिंग क्लब पुणे चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे स्नेहलला ट्रेनिंग व मार्गदर्शन चालु आहे.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर , बेलापूर आमदार सौ मंदाताई म्हात्रे ,दानशूर मा. खासदार रामशेठ ठाकुर,पनवेल महानगर पालिका सभागृह नगरसेवक परेश ठाकुर व अनेक हितचिंतकांकडून स्नेहल चे कौतुक होत आहे .
Tags
पनवेल