वडघर शाळा स्नेहसंमेलन आणि डिजिटल स्कूल उदघाटन





वडघर रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत डिजिटल वर्गाचे उदघाटन आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
पनवेल दि.२७(संजय कदम): रायगड जिल्हा परिषद शाळा मराठी वडघर या शाळेला ५० वर्षे पूर्ण झाले असून ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताचे औचित्य साधून आजी माजी शिक्षक वर्ग व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे तसेच डिजिटल पध्दतीने वर्गात मुलांना शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल वर्गाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले 



        या कार्यक्रमाला शाळेय शिक्षण आहार समिती अधिक्षक नवनाथ साबळे, केंद्र प्रमुख चिंचपाडा सुरेश जोशी, अध्यक्ष म. रा. प्रा.शि.संघ रायगड डॉ. सुभाष भोपी, चेरमन- उरण प्राथमिक शिक्षण पतपेढी डॉ. प्रशांत पाटील, सचिव - रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ, करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे, माजी अध्यक्ष अनिल भाताणकर, कामगार नेते शरद कांबळे, अध्यक्ष - ग्रामस्थ वडघर तथा शाळा व्यवस्थापन समिती चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष - नवतरुण मित्र मंडळ तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर -करंजाडे शेखर गायकवाड, प्रशासन अधिकारी ग्रामपंचायत वडघर मुकेश कांबळे, ग्राम विकास अधिकारी वडघर मोहन दिवकर, यांच्यासह शाळेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ , रा. जि.प.शाळा मराठी वडघर आजी माजी शिक्षक वर्ग माजी आजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने