पनवेल तालुक्यातून दोन वासरुंच्या चोरीसह श्री बिकानेर मिठाईवाला दुकानात घरफोडी करणार्‍या आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात







पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील बारापाडा गाव येथे तबेल्यामध्ये बांधलेल्या दोन वासरुंना तसेच आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानात घरफोडी करणार्‍या चार जणांपैकी तिघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे.




बारापाडा गाव येथील नदीम दळवी यांच्या तबेल्यामध्ये बांधलेले दोन वासरु अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरिता चोेरुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्र्रमाणे आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास 1 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार सुद्धा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहा.पो.नि.संजय गळवे, पो.हवा.विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, पो.शि.आकाश भगत आदींच्या पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेतला असता त्यांना आरोपी साकीब बॉम्बे (21), नाजीम पटेल (23), सरफराज पटेल (35) व त्यांच्या एका साथीदाराबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार या तीन आरोेपींना गुन्ह्यात वापरलेल्या दिड लाख रुपये किंमतीच्या गाडीसह ताब्यात घेेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे व फरार आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने