श्री दुर्गामाता मंदिर पनवेलतर्फे चाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन


पनवेल दि.१२ (संजय कदम) : पनवेल श्रतील मिडल क्लास हौसिंग सोसायटी येथे असलेल्या श्री दुर्गामाता मंदिर पनवेलतर्फे यंदाच्या चाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


         सोमवार दिनांक १८-०३-२०२४ रोजी श्री श्री दुर्गामाता मंदिराच्या चाळीसाव्या प्रतिष्ठापना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पहाटे काकड आरती, चंडिकाहवन, महाअभिषेक, महापूजा, दुर्गा माता भजन मांडता तर्फे भजने, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी पालखी उत्सव व तीर्थ प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अग्रवाल कुटुंबीयांनी दिली. या वर्धापन दिन सोहळ्यास पनवेलकरांसह भक्तांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. 


थोडे नवीन जरा जुने