नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याने ठोंबरेवाडी ग्रामस्थांचा उपोषण

*पनवेल (वैभव लबडे)* : दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने ठोंबरेवाडी मध्ये पुराची समस्या निर्माण होत असते त्यात आणखी भर म्हणून वाधाव ग्रुप व्हाईस सिटी पनवेल यांनी पाण्याचा प्रवाह बदलून व पाईप लाईन टाकून पाण्याचा निचरा होत नसल्याने गावाला चार वर्षे झाली पुराचा धोका व घरात दोन ते तीन फूट पाणी साचुन सामानाची दुर्दशा होत असते. त्यात भर म्हणून मे. मंत्रम वेचर एल. एल. पी. कॉमकॉन बिल्डर्स यांनी स्वतःच्या फायद्या साठी सर्व्हे नं. 118 मध्ये अनधिकृत मातीचा भर करून संपूर्ण नाल्याचा प्रवाहाच बदलला आहे.


 या मागणी साठी आम्ही आमरण उपोषणास बसलो असून या निवेदनाची प्रत आम्ही तालुका पोलीस ठाणे , पनवेल तहसिलदार यांना दिल्याची खाणावळे माजी सरपंच विलास ठोंबरे, रवी ठोंबरे, वैभव ठोंबरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना उपोषण कर्त्यांनी सांगितले की , आम्हाला न्याय न मिळाल्यास हा उपोषण असाच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसरपंच राजेश लबडे, अनिल चव्हाण, ज्ञानेश्वर धोंडू बडे, प्रशांत सोनवणे, वसंत ठोंबरे, वामन ठोंबरे, बळीराम कातकरी, विकास ठोंबरे, चंद्रकांत सोनवले, जगदीश प्रभू यांनी उपोषणकर्त्याना भेट दिली.


थोडे नवीन जरा जुने