कामोठे शहरातील नागरिकांना सध्या भेडसावणारा मोठा प्रश्नआज कामोठे कॉलनी फोरम टीम ने कामोठे शहरातील नागरिकांना सध्या भेडसावणारा मोठा प्रश्न म्हणजे गार्डन सुरक्षा व स्वच्छ्ता यावरती ठोस उपाययोजना करण्यात याव्या म्हणून, कामोठे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री अजय कांबळे साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली की कामोठे मधील विविध सेक्टर मध्ये असलेल्या उद्यानांमध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवून टवाळखोरी करणाऱ्या टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी..
त्याचबरोबर पालिका प्रशासनाने सर्व उद्यानांची स्वच्छता ठेवून नियमित पणे देखरेख करावी, अशी मागणी कामोठे कॉलनी फोरम व स्थानिक रहिवाशांतर्फे पनवेल महानगरपालिका प्रभाग(क) चे प्रभाग अधिकारी मा.श्री सदाशिव कवठे साहेब यांच्याकडे करण्यात आली .. त्यावेळी कॉलनी फोरमचे कामोठे शहर संघटक श्री अरुण मारुती जाधव, महिला अध्यक्ष सौ. जयश्री झा, कार्याध्यक्ष सौ.गीता कुडाळकर, उपाध्यक्ष सौ.शुभांगी खरात, प्रभाग ११ महिला अध्यक्ष सौ.शितल दिनकर, समन्वयीका सौ.अश्विनी सूर्यवंशी, समन्वयीका सौ.अपर्णा गावडे, युवा अध्यक्ष श्री राघवेंद्र गट्टेवार, सह संघटक श्री रवींद्र पाढी, वैद्यकीय मदत उपप्रमुख श्री पंकज पोदुत्वार हे उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने