माजी मुख्यमंत्री, मनोहर जोशी सर यांस श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली








सामाजिक जीवनात वेळ पाळणे व कामाची शिस्त ठेवणे हे मी सरांमुळे शिकलो ः बबनदादा पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख
राजकीय जीवनात सदैव पाठीशी उभा राहणारा असा एक नेता ः मा.बाळाराम पाटील
पनवेलकरांशी अतुट नाळ असलेले मनोहर जोशी सर हे नेहमी आठवणीत राहतील ः मा.जिल्हाप्रमुख माधव भिडे
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः आपल्या सर्वांचे लाडके माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, बाळासाहेबांचे सहकारी मनोहर जोशी सर यांस श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आज पनवेल येथील व्हि.के.हायस्कूल सभागृहात सर्वपक्षीय आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या पवित्र स्मृतीला शब्दसुमनांनी आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पनवेलवासिय उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला.




याप्रसंगी बोलताना शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी सांगितले की, सामाजिक जीवनात दिलेली वेळ पाळणे व कामात शिस्त ठेवणे हे मी फक्त सरांमुळेच शिकलो. माझ्या तरुणपणीच्या काळामध्ये सरांनीच मला शिवसेना प्रमुखांकडे नेले होतेे, याची आठवण मला आज सुद्धा आहे. त्यांच्यामुळेच शिक्षण क्षेत्रात काहीतरी करण्याची उमेद मला मिळाली. काही अडचण आली की मी त्यांच्याकडे नेहमीच धाव घेत असे व ते सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. सर्व पक्षीयांसाठी ते आदरणीय होते. त्यांची धडपड, शिकण्याची वृत्ती व सामाजिक भान महत्वाचे होते. आज शिवसेनाप्रमुखांसोबतच त्यांच्यामुळेच शिक्षण क्षेत्रात मी एवढी उंच भरारी मारु शकलो असेही त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना मा.आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणातील एक बुजूर्ग व आदर्श नाव म्हणजे मनोहर जोशी सर आहेत. राजकीय हेवेदावे विसरुन त्यांनी प्रत्येक वेळी मदत केली आहे. पनवेलवर त्यांचे विशेष प्र्रेम होते. त्यामुळेच त्यांना कुठलीही अडचण पनवेलविषयी कळल्यास ते त्वरित त्यातून मार्ग काढत असे. मी सभापती असताना किंवा जिल्हापरिषद अध्यक्ष असताना त्यानंतर आमदार असताना त्यांच्या अनेकवेळा सहवासात आलो व त्यांनी मला प्रेमच दिले आहे, असेही त्यांनी सांंगितले. तर आपल्या आठवणींना उजाळा देताना मा.जिल्हाप्रमुख माधवराव भिडे यांनी सांगितले की, राजकारणासह समाजकारणात त्यांनी झोकून देवून काम केले आहे. त्यामुळे ते आज उच्च पदापर्यंत पोहोचले होते. बाळासाहेबांचे विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. ते पक्षाशी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत राहिले. त्यामुळे आज प्रत्येकांच्या मनामध्ये त्यांची आठवण आहे. तर यावेेळी बोलताना एमटीडीसीचे माजी संचालक चंद्रशेखर सोमण यांनी सांंगितले की, 1955 ते 1969 या कालावधीमध्ये त्यांनी पनवेलमधील व्हि.के.हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले. शिक्षण घेताना वार लावून त्यांनी आपल्या जेवणाची सोय केली होती. अत्यंत खडतर असा जीवनात प्रवास त्यांनी केला. परंतु ते आपल्या ध्येय धोरणांशी प्र्रामाणिक राहिले.




 राजकारण, शिक्षण व उद्योग या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपले नाव उंचावले होते. महाजनबाई यांना ते कधीही विसरले नाहीत. त्यांच्या नावाने त्यांनी व्हि.के.हायस्कूल येथे वाचनालय सुरू केले. तर जिल्हा सल्लागार शिरिष बुटाला यांनी सांगितले की, एक अभ्यासू व लोकप्रिय नेता आपल्यातून गमावला आहे. यामुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी पक्षाची निष्ठा जपली त्यामुळेच बाळासाहेबांनी त्यांना एक शाखाप्र्रमुख ते देशाचे सर्वोच्च पद त्यांनी उपभोगले आहे. त्यांची आठवण पनवेलकरांसाठी कायमच स्मरणात राहणारी आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, मावळ मतदार संघाचे (उबाठा गटाचे) संघटक संजोग वाघेरे-पाटील, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, इतिहासप्र्रेमी सुधाकर लाड, अ‍ॅड.अरुण कुंभार, काँग्रेस पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, बी.पी.म्हात्रे सर, वंचित बहुजन आघाडीचे व्हि.डी.गायकवाड यांनी सुद्धा आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. या शोकसभेला शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, सभाापती नारायण घरत, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, मा.नगरसेवक रवींद्र भगत, शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, मा.नगरसेविका प्रिती जॉर्ज, मा.नगरसेवक अतुल पलण, मा.नगरसेवक जगदीश गायकर, शिवसेना पनवेल तालुका संपर्कप्र्रमुख योेगेश तांडेल, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, युवा सेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, काँग्रेसचे हेमराज म्हात्रे, अनिल पाटील, सुभाष पवार, गणेश म्हात्रे, कृष्णा कदम, मयुरेश खिस्मतराव, राकेश टेमघरे, अरुण ठाकूर, विजय गायकर, माधुरी गोसावी, अनिल कदम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने