पनवेल दि.१३ (वार्ताहर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होत काँग्रेसचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष अशोक हरिभाऊ खरे यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवबंधन बांधून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश केला.
शिरीष घरत यांच्या खांद्याला खांदा लावून विकास कामांना चालना देण्यासाठी आलो आहोत असं अशोक खरे यांनी म्हटलं आहे. तर जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी यावेळी अशोक खरे यांच्या निर्णयाचं स्वागत करत अशोक खरे सारखा शिवसैनिकांची गरज आहे, त्यांनी ज्या विश्वासाने शिवबंधन बांधून घेतले आहे. तो त्यांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले. अशोक खरे यांची राजकीय घडामोडी ही शिवसेनेतच झाली. ते सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांनी पनवेल बंदरारोड विभगाचे ते विभागप्रमुख म्हणून काम केलेले आहे. त्यांनी जे एम म्हात्रे नगराध्यक्ष असताना शिवसेनेकडून पनवेल नगरपालिकेची निवडणूकही लढविली होती
. पण दहा वर्षापूर्वी पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यानी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर तरुणपणीच हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ते त्यांना स्वस्त बसू देत नव्हते आणि ते विचार जोपासण्यासाठी, गोरगरीब, तळागाळातील जनतेची सेवा करता यावी म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यानी सांगितले. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने आगामी निवडणुकीत याचा संघटनेला मोठा फायदा होईल असे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर समन्वयक दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
पनवेल