जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन; पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*


पनवेल दि.११(संजय कदम) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल इलाईट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, पुज्य सिंधी पंचायत ट्रस्ट आणि दिलासा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला           शहरातील पूज्य सिंधी पंचायत हॉल मध्ये थेंब आहे रक्ताचा, आधार दुसऱ्याच्या जीवनाचा या शीर्षकाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे तरुण वर्गाने उपस्थित राहून रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन आयोजकांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. हे रक्तदान शिबीर एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या माध्यमातून संपन्न झाले. 


थोडे नवीन जरा जुने