पनवेल तहसीलदार कार्यालय परिसरात बेकायदा व्यवसायीकांमुळे होत आहे वाहतूक कोंडी*
पनवेल दि.१२(वार्ताहर): नेहमीच गर्दीचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरासह ग्रामीण भागातून अनेक जण आपल्या विविध शासकीय कामासाठी पनवेल तहसीलदार कार्यालय आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात येत असतात. परंतु या ठिकाणी बेकायदेशीर रित्या उभारण्यात आलेल्या व्यवसायीकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तरी अश्या बेकायदेशीर व्यवसायिकांवर कारवाईची करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाश्यांनी पनवेल महापालिका अतिक्रमण विभाग आणि पनवेल वाहतूक शाखेकडे केली आहे. 
        या ठिकाणी बेकायदेशीररित्या परप्रांतीयांनी नारळ पाणी विक्री, उसाचा रस चरखा, कलिंगडाची विक्री व इतर व्यवसाय भर रस्त्यात सुरु केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. एखादी घटना घडल्यावरच पनवेल महापालिका अतिक्रमण विभाग आणि पनवेल वाहतूक शाखेला जाग येणार का असा संतप्त सवाल या भागातील रहिवासी करत असून या वाहतूक कोंडीचा फटका येथील शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बसत आहेत. अनेक वेळा बेकायदेशोरपणे दुचाकी व चार चाकी वाहनेसुद्धा येथे मनमानी पद्धतीने उभी करण्यात येत आहेत. तरी अश्या वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.


थोडे नवीन जरा जुने