कोरलवाडी येथे आदिवासी बांधवांसाठी रेशन कार्ड, जातीचे दाखले व इतर शासकीय प्रमाणपत्र नोंदणी शिबिर संपन्न







पनवेल दि.०२ (वार्ताहर): रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासह मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालय पनवेल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, ग्रुप ग्रामपंचायत आपटा, ग्रुप ग्राम पंचायत गुळसुंदे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यांतील दुर्गम भागात असलेल्या कोरलवाडी (आपटा) येथे आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले, रेशन कार्ड व इतर शासकीय प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 



             यावेळी ग्राम संवर्धनचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, मंडळ अधिकारी, दापिवली वीणा कोरगावकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू परशुराम पाटील, मानसीताई पाटील, गुरुदास वाघे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणचे निरीक्षक, विठ्ठल पांढरे, तलाठी सजा आपटा च्या कविता बळी, ग्रुप ग्राम पंचायत आपटा चे ग्राम विकास अधिकारी गणेश गायकर, कोरलवाडी ग्रामस्थ लक्ष्मण पवार, संतोष पवार,आपटा तलाठी कोतवाल प्रकाश म्हात्रे, ग्राम पंचायत कर्मचारी लक्ष्मण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने