पनवेल दि. ०३ ( संजय कदम ) : "दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी" आपला भारत देश जरी पोलिओमुक्त असला तरी अजूनही काही देशांमध्ये पोलिओ रुग्ण आढळत आहेत; म्हणूनच पोलिओमुक्त भारत नेहमीच निरोगी असला पाहिजे याकरिता पनवेल महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या लसीकरणाला बळकटी देण्याकरिता व वार्डातील सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याकरिता सौ मोहिनी विक्रांत पाटील, डॉ.अमोल गडीकर वैद्यकीय सहायक संचालक पुणे, डॉ.आनंद गोसावी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका, डॉ.रेहाना मुजावर माता बाल संगोपन अधिकारी पनवेल, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज आदी मान्यवर तसेच आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Tags
पनवेल